दारुबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस स्टेशनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:28 PM2020-05-12T17:28:29+5:302020-05-12T17:29:03+5:30

बेकायदा दारू विक्री बंद करावी, अशी मागणी १२ मे रोजी येथील महिलांनी पोलिस स्टेशनला धडक देवून निवेदनाव्दारे केली आहे.

Women rams inton police station for demand of liquor ban | दारुबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस स्टेशनमध्ये

दारुबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस स्टेशनमध्ये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मानोरा शहरातील मदीना नगर व इतर ठिकाणी बेकायदा दारू विक्री राजरोस सुरु आहे.त्यामुळे महिलांना त्रास होत असून सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. सदर बेकायदा दारू विक्री बंद करावी, अशी मागणी १२ मे रोजी येथील महिलांनी पोलिस स्टेशनला धडक देवून निवेदनाव्दारे केली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक मानकर यांना निवेदन सुध्दा देण्यात आले.
मदीना नगर येथे बेकायदा दारू विक्री सुरु आहे, त्यामुळे घरघुती तंटे निर्माण होतात. ही दारू विक्री अंगणवाड़ी क्रमांक १ च्या जवळ व मदीना मस्जिदजवळ सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो .तसेच कौटुंबिक हिंसाचार वाढला आहे. महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
तरी शाहरातील बेकायदा दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी पोलीस स्टोशनमध्ये धडक देवून आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी  कविता मानकर, जीजाबाई मानकर, लीलाबाई मानकर, बेबिबाई पवार, कांता टोलगुण्डे, शेवंताबाई जाधव, अनुसूया मानकर यांनी यांची उपस्थिती होती.


-  शहरातील काही भागात हातभट्टी व बेकायदा दारू विक्री सुरु असल्याचे निवेदन प्राप्त झाले आहे.त्याचा शोध घेऊन बेकायदा दारू विरुद्ध कारवाई तातडीने करणार. यापुढे हातभट्टी वर धाडी टाकल्या जाईल.
-  शिशिर मानकर
पोलिस निरीक्षक, मानोरा

Web Title: Women rams inton police station for demand of liquor ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.