खत विक्रेत्यांना कार्यशाळेतून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 03:57 PM2021-02-02T15:57:00+5:302021-02-02T15:57:09+5:30
Washimi News १ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती वाशिम येथील नि.कृ.गोटे सभागृहात आयोजित कार्यशाळेत कृषी अधिकाºयांनी मार्गदर्शन केले.
वाशिम : पॉस मशिन नवीन व्हर्जन व इतर अनुषंगिक बाबींचे प्रशिक्षण आणि अडीअडचणीबाबत वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यातील अनुदानित खत विक्रेत्यांना १ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती वाशिम येथील नि.कृ.गोटे सभागृहात आयोजित कार्यशाळेत कृषी अधिकाºयांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, मोहीम अधिकारी चंद्रकांत भागडे, वाशिम पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, कृषी सेवा केंद्र संचालक संघटनेचे सुनील पाटील, आरसीएफचे जिल्हा व्यवस्थापक वाईनदेशकर यांच्यासह कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व खत विक्रेते व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्यक्ष साठा आणि इ-पॉस खत साठा हा समान असण्याची खात्री करणे, आॅफलाईन खत विक्री करणाºया विक्रेत्यांवर कारवाईचा प्रस्ताव परवाना अधिकाºयांकडे सादर करणे, सर्व खत विक्रेत्यांकडे इ-पॉस मशिन ३.१ व्हर्जन अपडेट करणे, जास्तीत जास्त खत विक्रेत्यांकडे डेस्क टॉप व मोबाईल व्हर्जन सुरू करून देणे आणि प्रशिक्षण देणे, आॅनलाईन पद्धतीने खत विक्री करताना येणाºया अडी-अडचणी सोडविणे आदी विषयांवर या कार्यशाळेत चर्चा झाली. खत विक्रेत्यांनी शासन नियमानुसार विक्री करावी, इ पॉस मशिनवरील साठ्याप्रमाणे खत वितरण करावे, काही शंका, अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी बंडगर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी तर विस्तार अधिकारी आशिष मुळे यांनी आभार प्रदर्शन केले.