श्री क्षेत्र डव्हा : श्री नाथनंगे महाराज यात्रा महोत्सवाची बुधवारी होणार सांगता; २०० क्विंटल महाप्रसादाचे होणार वितरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 04:32 PM2018-01-23T16:32:50+5:302018-01-23T16:35:20+5:30

मालेगाव  :  श्री क्षेत्र डव्हा येथिल श्री नाथनंगे महाराज संस्थान येथिल यात्रा महोत्सवाची २४ जानेवारी रथसप्तमीला होणाऱ्या  महाप्रसादाने सांगता होणार आहे . २०० क्विन्टल महाप्रसादाचे  वितरण होणार आहे. एक लाख भाविक  महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत 

Yatra Mahotsav will be held on Wednesday; Distribution of 200 quintals of Mahaprassad | श्री क्षेत्र डव्हा : श्री नाथनंगे महाराज यात्रा महोत्सवाची बुधवारी होणार सांगता; २०० क्विंटल महाप्रसादाचे होणार वितरण 

श्री क्षेत्र डव्हा : श्री नाथनंगे महाराज यात्रा महोत्सवाची बुधवारी होणार सांगता; २०० क्विंटल महाप्रसादाचे होणार वितरण 

googlenewsNext
ठळक मुद्दे यात्रा महोत्सवाची सुरुवात १८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता श्री नाथनंगे महाराज ,विश्वनाथ बाबा व संस्थानमधील देवतांच्या मूतीर्ची शाश्वत महापूजा विश्वस्त मंडळाच्या वतीने करून करण्यात आली .यात्रा महोत्सवाची २४ जानेवारी रथसप्तमीला होणाऱ्या  महाप्रसादाने सांगता होणार आहे . २०० क्विन्टल महाप्रसादाचे  वितरण होणार आहे; एक लाख भाविक  महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत 

मालेगाव  :  श्री क्षेत्र डव्हा येथिल श्री नाथनंगे महाराज संस्थान येथिल यात्रा महोत्सवाची २४ जानेवारी रथसप्तमीला होणाऱ्या  महाप्रसादाने सांगता होणार आहे . २०० क्विन्टल महाप्रसादाचे  वितरण होणार आहे. एक लाख भाविक  महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत.

   यात्रा महोत्सवाची सुरुवात १८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता श्री नाथनंगे महाराज ,विश्वनाथ बाबा व संस्थानमधील देवतांच्या मूतीर्ची शाश्वत महापूजा विश्वस्त मंडळाच्या वतीने करून करण्यात आली .यावेळी संस्थान चे अध्यक्ष बाबुराव घुगे  सचिव डॉ निवासराव मुंढे,नारायणराव घुगे ,गोवर्धन महाराज गोविंदराव सांगले ,सुभाषराव घुगे , आदि उपस्थित होते .श्रीमद भागवत सप्ताह व विश्वजिवन ग्रंथ सामुदायिक पारायणा यांची सांगता बुधवारी होणार आहे.             यात्रा महोत्सवात गायत्री जप ,श्री विश्वनाथ महाराज क्रूत अभिषेक व हवन वेद शास्त्र सम्पन्न शशिकांत देव यांच्या आचार्यत्वाखाली पार पडत आहेत .श्रीमद भागवत वाचन नारायण महाराज खडकिकर करीत आहेत .हरिनाम सप्तह  सीताराम महाराज  खानझोडे यांचे मार्गदशरणाखाली हरिनाम  होत आहे , श्री विश्वाजीवन ग्रंथ  व्यासपीठ  गोवर्धन महाराज राऊत सांभाळत आहेत . १८ जानेवारीपासून श्रीराम महाराज पांगरी नवघरे,  पुरुषोत्तम महाराज, विशाल महाराज बढे ,बोरी (चंद्रशेखर) , मधुकर महाराज देगावकर , सुरेश महाराज बोफडे (पोफळी कारखाना), उत्तम महाराज सरकटे आळंदी देवाची यांचे कीर्तन झाले.  २४ जानेवारी रथसप्तमी ,बुधवार रोजी सिताराम महाराज आसेगाव, यांचे तर  २५ जानेवारी गुरुवार रोजी हभप सिताराम महाराज खानझोडे आसेगाव पेन यांचे ,सकाळी ७ते ९ वा काल्याचे किर्तन होणारआहे   नंतर श्री नाथ नगे महाराज यांचा पालखीची मिरवणूक निघेल . २५ जानेवारी गुरुवार रोजी हभपश्री नारायण महाराज खडकीकर यांचे किर्तन चाकातीर्थावर होणार आहे.           यात्रा महोत्सवाची सांगता २४ जानेवारी ला महाप्रसादाने होणारआहे . या सांगता समारोहासाठी संस्थानच्यावतिने जय्यत तयारी करण्यात आली आहे. विविध समित्या स्थापन करण्यात आले आहेत. भाविकांची गैरसोय होवू नये याकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवाला जिल्हयासह पर जिल्हयातील व मराठवाडयातील भाविकांची उपस्थिती असते.


७५ क्विंटल गहू , ५० क्विंटल भाजी , १५ क्विंटल बुंदीचा समावेश

    महाप्रसादासाठि ७५ क्वीन्टल गहू , ५० क्विन्टल भाजी , बुन्दिसाठि बेसन १५ क्विन्टल ,साखर ३० क्विन्टल  तर तेल३० क्विन्टल लागणार आहे . संस्थान वर महाप्रसादसाठी पूरी व बूंदी तयार करण्यास सुरुवात झाली आहे .. बूंदी तयार करण्यासाठी डोंगरकिन्हीं येथिल सेवाधारी सेवाराम आड़े ,बल्लु महाराज ,संतोष राठोड,प्रल्हाद राठोड ,ललित देशमुख ,प्रवीण पाटील ,सुनिल देशमुख ,शामा नाईक सह ५० भाविक परिश्रम घेत आहेत . श्रध्देने महाप्रसाद तयार करीत आहेत.

५० ट्रक्टर मधुन महाप्रसादाचे वाटप

     महाप्रसाद वितरना करिता २५०० स्वयंसेवक राहणार आहेत.  ५० ट्रक्टर मधुन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे . पाणी वाटपासाठी ६ टँकर राहणार आहेत  .रथसप्तमीला प पू नाथनंगे महाराजांनी प पू विश्वनाथ महाराजांच्या शरीरात परकाया प्रवेश श्री क्षेत्र माहूर येथे केला होता . त्याचे स्मरण म्हणून या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते .या महोत्सवात या वर्षी  एक लाख भाविक  महाप्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज आहे यात्रा महोत्सवास १८ जानेवारीपासुन सुरुवात झाली आहे .यामध्ये विश्वजीवन ग्रंथाचे पारायण , हरिकीर्तन , भजन आदि धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत मंदिरातील पूजा कैलासराव देशमुख करीत आहेत. यात्रा महोत्सवात  , रोगनीदान शिबिर , जागृती शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे .यात्रा महोत्सवाच्या आयोजनासाठी संस्थान चे अध्यक्ष बाबूराव घूगे  विश्वस्त डॉ नीवासराव मुन्ढे ,गोवर्धन महाराज ,सुरेशराव घूगे ,द्न्यानेश्वर खरबडे ,प्रभुराव घुगे यांचेसह  सुभाषराव घुगे परिश्रम घेत आहेत.

Web Title: Yatra Mahotsav will be held on Wednesday; Distribution of 200 quintals of Mahaprassad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम