महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून या परिषदेविषयी तसेच ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’च्या कार्याविषयी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दौरा ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’नंतर लगेचच सुरू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने वाशिम जि. प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण देण्यात आले व ‘सरपंच संसद’ उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. 'एमआयटी - महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, प्रांत समन्वयक व्यंकटेश जोशी, नाशिक विभाग समन्वयक संजय भांबर, अमरावती विभाग समन्वयक अभय खेडकर व वाशिम जिल्हा समन्वयकांची उपस्थिती होती. यावेळी योगेश पाटील यांनी इस्रायल दौऱ्याचे नियोजन व दौरा कशासाठी त्यांचा उपयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा होईल, या हेतूने हा दौरा होणार आहे.
जि.प. अध्यक्षांना इस्रायल दौऱ्याचे निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:39 AM