कोल्हापूर - नगरसेवकांना ओळखपत्र पाहून महानगरपालिकेत प्रवेश देण्याच्या कारणावरून आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची पोलीस प्रशासनाबरोबर सोमवारी वादावादी झाली. माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका अश्विनी रामाणे यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. या निवडीच्या दरम्यान महानगरपालिका परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.