शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टभूजा महासरस्वती रुपात बांधली पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 06:09 PM2017-09-24T18:09:57+5:302017-09-24T18:11:53+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टभूजा महासरस्वती रुपात पूजा बांधण्यात आली. दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टभूजा महासरस्वती रुपात पूजा बांधण्यात आली. दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मंदिर परिसरात भाविकांचा महापूर लोटला होता. अभिषेक आणि दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची अष्टभूजा महासरस्वतीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. दुर्गासप्तशतीमधील ही उत्तम चरित्रानी नायिका असून ती दुर्गेचेच एक स्वरुप आहे. कौशिकी हे या देवतेचे दुसरे नाव. शुंभ-निशुंभ या असुरांच्या नाशासाठी पार्वतीच्या स्वरुपात या देवीचा अविर्भाव आहे. या देवीने शुंभ निशुंभांच्या धुम्रलोचन नामक दूताला नुसत्या हुंकाराने भस्मसात के. या देवतेच्या आठ हातांमध्ये घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य, आणि बाण अशी आयुधे आहेत. या देवतेच्या पराक्रमामध्ये विविध देवांची स्त्रीरुपेही सहाय्यकर्ती झाली. ब्राह्मणी, कौमारी, वैष्णवी, माहेश्वरी या सप्तशतीतील सुप्रसिद्ध असा नारायणी स्तुती अध्याय याच देवतांसाठी रचला आहे. महासरस्वतीचा वर्ण धवल असून ही देवता सिंहवाहिनी सांगितली आहे. श्रीपूजक माधव मुनिश्वर व मकरंद मुनिश्वर यांनी ही पूजा बांधली.