पुण्यातील चतु:श्रृंगी येथील उद्योगपती डी. एस. के यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन केलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरहून आलेल्या कर्मचा-यांनी डी.एस.के विरोधात ठिय्या आंदोलन केलं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार थकीत असल्यानं अन्न, पाण्याचा त्याग करून हे आंदोलन केलं आहे.