कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्रृंगेरी शारदाम्बा रुपात पूजा बांधण्यात आली. शंकराचार्य परंपरेत शारदाम्बेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदा म्हणजे सरस्वती. ही ज्ञानाची देवता. शंकराचार्यांनी प्रथमत: श्रृंगेरी क्षेत्राचे महत्व जाणून या देवतेची चंदनाची मूर्ती घडवून ती विद्यमान स्थानी श्रीचक्रावर स्थापन केली. परकीय आक्रमणात चंदनाच्या मूर्तीला क्षती पोहोचल्यावर सुवर्णविग्रह स्थापन करण्यात आला. ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.