आरे वाचवा, जंगल वाचवा; मानवी साखळीत 2 हजार लोकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 06:01 PM2019-09-08T18:01:46+5:302019-09-08T18:02:18+5:30
मेट्रो 3 कार शेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने गोरेगाव (पूर्व) आरेतील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. याविरोधात तरुणाईसह ...
मेट्रो 3 कार शेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने गोरेगाव (पूर्व) आरेतील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. याविरोधात तरुणाईसह अनेक पर्यावरणवादी संस्था एकवटल्या आहेत. आज सकाळी 11 वाजता आरे वनविभागातील आदिवासी व विविध पर्यावरण संस्थांचे कार्यकर्ते, महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिक यांनी भर पावसात आरे पिकनिक पॉईंटजवळ जवळपास 2000 नागरिक व पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी करून वृक्षतोडीला जोरदार विरोध केला. त्यांनी मोठी मानवी साखळी करून वृक्ष तोडीला जोरदार विरोध दर्शवला. तर बायकर्स ग्रुपनेदेखील आपल्या दुचाकींवर स्वार होऊन मेट्रो कार शेडला जोरदार विरोध केला