मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी 'ठाकरे' चित्रपटाचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. वडाळ्यातल्या कार्निव्हल आयमॅक्समध्ये सुरू असलेल्या या स्क्रीनिंगला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं सिनेमागृह फुल्ल झालं. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अभिजित पानसेंना सिनेमागृहात बसण्यासाठी मागच्या बाजूला जागा न मिळाल्यानं अभिजित पानसे प्रचंड संतापले. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊतांचं ऐकून न घेता 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगमधून अभिजीत पानसे कुटुंबीयांसह तडकाफडकी निघाले. त्यामुळे स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.