प्रतीक्षा संपली! मुंबईत उद्यापासून एसी लोकल धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 02:09 PM2017-12-24T14:09:29+5:302017-12-24T14:10:39+5:30
मुंबईत वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न उद्यापासून प्रत्यक्षात उतरणार आहे. पहिली एसी लोकल उद्या दुपारी 2.10 वाजता अंधेरी ...
मुंबईत वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न उद्यापासून प्रत्यक्षात उतरणार आहे. पहिली एसी लोकल उद्या दुपारी 2.10 वाजता अंधेरी येथून सुटेल आणि ती चर्चगेटपर्यंत धावेल. त्यानंतर अंधेरी ते विरार नियमित फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. एसी लोकल सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार असून शनिवार-रविवारी या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे. भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचा किमान तिकीट दर 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे.