Next

'आर्यनला सोडण्यासाठी शाहरुखकडे २५ कोटी मागितले' | Asked Shah Rukh for Rs 25 crore to release Aryan

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 15:36 IST2021-10-24T15:35:19+5:302021-10-24T15:36:29+5:30

कॅार्डिलिया क्रूझ पार्टी प्रकरणाला आता सनसनाटी वळण लागलंय… या प्रकरणातला पहिला पंच आणि फरार मध्यस्थ किरण गोसावी याचा पर्सनल बॅाडिगार्ड असलेल्या प्रभाकर साईल हा स्वत:हून मिडियासमोर आलाय. त्याने खळबळजनक गौप्यस्फोट केलाय… एनसीबीच्या माध्यमातून किरण गोसावी ह्याने सुपरस्टार शाहरूख खान याच्याकडे आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी केली असा आरोप केलाय. या आरोपादाखल प्रभाकर साईलने एक व्हिडिओ क्लिपसुद्धा उघड केलीय. त्यात किरण गोसावी आर्यन खानचे शाहरूख खानशी मोबाईलवरून बोलणं करून देतोय हे स्पष्ट दिसतंय…