बनावट कागदपांच्या सहाय्याने खंडाळा येथील चार एकर(50 कोटी किंमतीची) जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला (74) गुजरातमधून आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली. लकडावाला विमानाद्वारे लंडनला जात असताना त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्र दाखल केले होते. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनच ईओडब्ल्यूकडे तक्रार करण्यात आली होती.