क्रॉफर्ड मार्केटमध्ये बर्निंग कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 00:10 IST2017-11-06T00:10:06+5:302017-11-06T00:10:26+5:30
मुंबई : फोर्ट परिसरातील क्रॉफर्ड मार्केट येथील नागदेवी स्ट्रीटवर एका कारने रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. घटनेची ...
मुंबई : फोर्ट परिसरातील क्रॉफर्ड मार्केट येथील नागदेवी स्ट्रीटवर एका कारने रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच फोर्ट अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी कार जळून खाक झाली आहे. नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार,दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी तपास सुरू आहे.