मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस शनिवारपासून सुरू झाली आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नवी दिल्लीपर्यंत धावणाऱ्या या गाडीला रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या गाडीने कल्याणहून दिल्लीत अवघ्या १८ तास ४२ मिनिटांत पोचता येईल. या गाडीला नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा कॅन्टोनमेंट थांबे देण्यात आले आहेत.