मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. बेस्ट कामगारांचे नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. तसेच प्रशासनाने मागण्या मान्य केल्या असून कामगारांच्या पगारात किमान 7 हजार रुपयांची वाढ होईल, असेही राव यांनी यावेळी सांगितले. कामगार जिंकला, कामगार एकजुटीचा विजय असो, या घोषणांनी वडाळा बस डेपोचा परिसर दणाणून गेला होता. तर, कामगारांच्या चेहऱ्यावर 8 दिवसांनी आनंद दिसत होता.