मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 17:55 IST2019-06-28T17:54:24+5:302019-06-28T17:55:37+5:30
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांना पावसाने आज सकाळपासून मोठा दिलासा दिला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी ...
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांना पावसाने आज सकाळपासून मोठा दिलासा दिला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेद मंदावला आहे. तर रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे उशिराने धावत आहे.