International Yoga Day 2018 : जाणून घ्या, कसं करतात मार्जारासन आणि त्याचे फायदे
By harshada.shirsekar | Published: June 21, 2018 07:02 AM2018-06-21T07:02:03+5:302018-06-21T19:00:56+5:30
मुंबई- तास-न्-तास खुर्चीवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे पाठीच्या कण्याचे स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत आहेत. हवी तशी पाठीच्या कण्याची हालचाल होत ...
मुंबई- तास-न्-तास खुर्चीवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे पाठीच्या कण्याचे स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत आहेत. हवी तशी पाठीच्या कण्याची हालचाल होत नसल्यानं त्याच्या लवचिकता नाहीशी होते. यावर उपाय म्हणून मार्जारासन अ/ब आणि त्रिपाद मार्जारासनाचा अभ्यास करावा. मात्र ज्यांना पाठीच्या कण्यामध्ये तीव्र वेदना आहेत, अशांनी ही आसनं करू नयेत. शिवाय स्पॉन्डिलॉसिसची समस्या असणाऱ्यांनी मार्जारासन ब करणं टाळावं. लाभ - पाठीचा कणा लवचिक व सुदृढ होतो. कंबर, मानेच्या दुखण्यातून सुटका मिळते. मेरुदंडाशी जोडलेल्या नाड्या सशक्त होतात.कंबर, पोट, मानेचे स्नायू मजबूत होतात.Video Editor -Digambar RasweVideo Journalist - Aniket Shinde