जेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या अक्षम्य चुकीमुळे जवळपास 100 हून अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला होता. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास कर्मचारी विसरला. कर्मचाऱ्याच्या या चुकीमुळे विमानात हवेचा दाब वाढला. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या कान-नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तर काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती.