मुंबई- टीव्हीवाहिन्या, सिनेमा, पुस्तके यांच्यामध्ये पुरुषांची रंगवली जाणारी प्रतिमा आणि प्रत्यक्ष पुरुष यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी लोकमतशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या चर्चेमध्ये व्यक्त केले. लोकमतच्या 'बाईमाणूस' या जागतिक महिलादिनानिमित्त उपक्रमामध्ये ते बोलत होते.अजूनही ज्या प्रकारे पुरुषांची प्रतिमा सर्वत्र रंगवली जाते त्यावर जुनाट कथित स्त्रीवादी विचारांचा पगडा दिसून येतो, असे मत कुंडलकर आणि अवचट यांनी व्यक्त केले. या प्रकारचे पुरुषांच्या प्रतिमांचे सामान्यीकरण अर्थातच वास्तवापेक्षा फारच वेगळे आहे. अशा प्रकारच्या अनेक विषयांवर चर्चा झाली पाहिजे, असे मत या दोघांनी आपल्या संवादात मांडले.