मुंबई - डोंगरी परिसरात 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला, या दुर्घटनेत 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ टीमकडून घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कौसर बाग असं या इमारतीचं नाव असून खूप जुनी बिल्डींग असल्याचं सांगण्यात येत आहे.