मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत.