'राजकुंद्राचा पार्टनर सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCB ला दिली? Kunal Jani-NCB Connection
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 19:01 IST2021-10-24T18:59:31+5:302021-10-24T19:01:05+5:30
आर्यन खानचा एनसीबी ऑफिसमधला एक नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत किरण गोसावी हा आर्यनचं कुणाशीतरी फोनवरुन बोलणं करुन देताना दिसतोय. त्याच व्हिडिओत आणखी एक व्यक्ती दिसतोय जो खुर्चीवर अगदी आरामात बसलाय. ही व्यक्ती कुणाल जानीसारखी दिसतेय. कुणाल जानी ही तीच व्यक्ती जी सुशांतसिंहप्रकरणात जेलमध्ये गेली होती, जी राज कुंद्राची बिझनेस पार्टनर आहे. मग असा व्यक्ती एनसीबी कार्यालयात काय करत होता? कुणाल जानी नेमका कोण आहे, कुणाल जानीचं तिथे असणं याचा अर्थ काय? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.