मुंबई - मुंबईतील मोनो रेलची सेवा 1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चेंबूर ते वडाळा स्थानकापर्यंत मोनो रेलची सेवा प्रवाशांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार असून सध्या मोनो रेलची चाचणी सुरू आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोनो रेलची सेवा सुरू करण्यात येणार आहे की नाही?, याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत होती. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून 1 सप्टेंबरपासून मोनो रेल पुन्हा धावणार आहे.