रेल्वेमधील नोकर भरतीत मराठी उमेदवारांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याकरिता आज स्थानीय लोकाधिकार समितीच्यावतीने शिवसेना सचिव व लोकाधिकार समितीचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वावाखाली मुंबई रेल्वे बोर्ड, मुंबई सेंट्रल येथे आंदोलन करण्यात आले.