मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यात चिपळुण तालुक्यातील तिवरे धरण फटून तिवरे गावातील अनेक घरं दुर्घटनाग्रस्त झाली. अनेकांचे संसार उध्द्वस्त झाले. त्यामुळे या पीडितांच्या मदतीला सिद्धिविनायक मंदिर न्यास धावून आली आहे. तिवरे गावात ज्यांची घरं पडली त्यांची घरं पुन्हा नव्याने बांधून देणार याबाबत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षतेत विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला इतकच नाही तर तिवरे गावातील शाळा देखील सिद्धिविनायक मंदिर न्यास बांधून देणार आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करून सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती आदेश बांदेकर यांनी दिली.