Next

Happy New Year 2019 : नववर्षाचं स्वागत सिद्धिविनायकाच्या आरतीने!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 11:01 AM2019-01-01T11:01:06+5:302019-01-01T11:02:51+5:30

मुंबई  - जगभरात  नववर्षाची  धूम पाहायला मिळत आहे. मुंबईतील  प्रसिद्ध ठिकाणांवर मध्यरात्री मुंबईकरांसह राज्यातून न्यू ईअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या ...

मुंबई  - जगभरात  नववर्षाची  धूम पाहायला मिळत आहे. मुंबईतील  प्रसिद्ध ठिकाणांवर मध्यरात्री मुंबईकरांसह राज्यातून न्यू ईअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या सेलिब्रेशननंतर आता,  नववर्षाची  सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करण्यात येत आहे. भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.  मुंबईकरांचं आराध्य दैवत आणि प्रसिद्ध गणेश मंदिर असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात नववर्षाची सुरुवात श्रींच्या आरतीने झाली. नववर्ष मंगलमय, आनंददायी आणि सुखकर जाण्यासाठी सुखकर्ता-दुखहर्ता विघ्नविनायकाच्या चरणी भक्तगण नतमस्तक झाले आहेत.