Next

गोरेगाव ते सीएसटीदरम्यान महिन्याभरात हार्बर रेल्वे सेवा होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 04:22 PM2018-02-20T16:22:39+5:302018-02-20T16:23:13+5:30

मुंबई- गोरेगाव ते सीएसटी हार्बर रेल्वेच्या अंतिम मंजुरीसाठी खास दिल्लीवरून वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक आले होते. त्यांच्या मंजुरीनंतर या ...

मुंबई- गोरेगाव ते सीएसटी हार्बर रेल्वेच्या अंतिम मंजुरीसाठी खास दिल्लीवरून वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक आले होते. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गावर या महिना अखेरी हार्बर रेल्वे सुरू होईल, अशी आशा रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. गोरेगाव ते सीएसटीसाठी लवकरच हार्बर सुरू होणार असून सध्या ट्रायल सुरू आहे. गोरेगाव स्थानकावरील हार्बर फलाटावर आज दुपारी 3 वाजता गाडी आल्यावर गोरेगावकरांनी आनंद व्यक्त केला.