मुंबई : योजना कर्मचारी समन्वय समिती (सीटू) या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये तळागाळात काम करणाऱ्या मानधनी, विना-मानधनी योजना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात आली. संबंधित मंत्र्यांकडून चर्चेसाठी वेळ मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केल्याचे समन्वय समितीने सांगितले.