Next

'तैमूरपासून सांभाळून राहा'; करीना कपूरने दिला अक्षय कुमारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 10:26 AM2018-04-11T10:26:16+5:302018-04-11T14:58:53+5:30

तैमुरला प्रसारमाध्यमांकडून दिली जाणारी प्रसिद्धी पाहून सैफ आणि मला कधीकधी भीती वाटते. त्याला माध्यमांनी अक्षरश: राजकीय नेता केले आहे, ...

तैमुरला प्रसारमाध्यमांकडून दिली जाणारी प्रसिद्धी पाहून सैफ आणि मला कधीकधी भीती वाटते. त्याला माध्यमांनी अक्षरश: राजकीय नेता केले आहे, असे विधान बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिने केले. ती मंगळवारी  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या मुलाखतीत बोलत होती. यावेळी करिनाला तैमुरबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांना करिनाने आईच्या भूमिकेतून मोकळेपणाने उत्तरे दिली.