सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून बसविलेल्या रेलिंगमुळे प्रवाशांचा त्रास वाढला आहे. त्यातच पूल गंजलेला आहे. जास्त प्रवासी या पुलावरून ये-जा करताना हा पूल हलतो. गर्दीच्या वेळी दुर्घटनेची भीती नाकारता येत नाही.