Next

हवालदाराला मारहाण करणा-या तिघा तरुणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 23:49 IST2018-03-11T23:49:34+5:302018-03-11T23:49:34+5:30

मुंबई - कर्तव्यावर असताना पोलीस हवालादाराला मारहाण करणा-या तिघा तरुणांना ताडदेव पोलिसांनी रविवारी अटक केली. विशाल रामसिंग ठाकूर (२७), जगतसिंग ब्रीजमोहन पंडीत (३४), देवेंद्र गजानन ठाकूर (२७) तिघे ताडदेव येथे राहणारे असून सर्वांना २२ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. हवालदार उत्तम संपत पवार (५२) यांना त्यांनी किरकोळ कारणांवरुन मारहाण केली होती. त्याची चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शनिवारी तिघांच्या विरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला होता.