मुंबईतील रे रोड परिसरात करडे गिधाड दिसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राणिमित्रांकडून या गिधाडाचा शोध सुरू आहे. वन्यविभागाने अद्याप गिधाड मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र दुपारपासून व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर प्राणिमित्र या प्रजातीचा कसून शोध घेत आहेत. मुळात हिमालयीन ग्रिफॉन म्हणजेच करडे गिधाड ही जात महाराष्ट्रात आढळत नाही. मात्र कथित व्हिडीओमध्ये दिसणारे गिधाड हे त्याच प्रजातीचे असल्याने प्राणिमित्रांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या गिधाडाचा प्राणीमित्र सर्वत्र शोध घेत आहेत.