Next

कामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाचे जेलभरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:43 PM2018-10-08T14:43:19+5:302018-10-08T15:00:51+5:30

मुंबई  - राज्य व केंद्र सरकारने निवडणुकांपुर्वी दिलेली आश्वासन पाळली नाही, उलट कामगार कष्टकरी जनतेचे हक्काचे कायदे मोडीत काढून ...

मुंबई  - राज्य व केंद्र सरकारने निवडणुकांपुर्वी दिलेली आश्वासन पाळली नाही, उलट कामगार कष्टकरी जनतेचे हक्काचे कायदे मोडीत काढून कारखानदार यांना संरक्षण देण्याचे काम सरकार करीत आहे. त्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक या कामगार संघटनेने ८ ऑक्टोबरला भायखळा येथील राणीबाग ते आझाद मैदान अशा एल्गार मोर्चाची हाक दिली होती. मात्र पोलीस परवानगीअभावी याठिकाणी जेलभरो आंदोलनाचा निर्णय घेतल्याची माहिती कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी दिली.