भाजपाशी युतीबद्दल विचारताच आदित्य म्हणाले, 'साफसफाई सुरू आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 13:18 IST2018-06-06T13:17:45+5:302018-06-06T13:18:54+5:30
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 'एकला चलो रे' चा नारा देत भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. ...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 'एकला चलो रे' चा नारा देत भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यासंदर्भात मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेनेने घेतलेल्या 'एकला चलो रे' च्या भूमिकेविषयी विचारण्यात आले. तेव्हा आदित्य यांनी आम्ही 'साफसफाईला' सुरुवात केली असल्याचे सांगितले. आदित्य यांच्या या विधानाचा रोख भाजपासोबत उरलेसुरले नाते संपवण्याच्या दिशेने असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.