Next

घरी कोण बॉस, कोण डिसिजन मेकर; सांगताहेत फडणवीसांच्या होम मिनिस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 10:35 AM2019-02-21T10:35:58+5:302019-02-21T10:36:37+5:30

माणूस घराबाहेर कोणीही असला, कितीही मोठा असला, तरी घरात बायकोशी भांडण झाल्यावर नवऱ्यालाच सॉरी म्हणावं लागतं, असा घरगुती किस्सा ...

माणूस घराबाहेर कोणीही असला, कितीही मोठा असला, तरी घरात बायकोशी भांडण झाल्यावर नवऱ्यालाच सॉरी म्हणावं लागतं, असा घरगुती किस्सा मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितला. अभिनेता  रितेश देशमुखनं  लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 सोहळ्यात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  आणि  अमृता फडणवीस  यांची मुलाखत घेतली. त्यात या दोघांनी अनेक गोष्टींवर अगदी दिलखुलासपणे भाष्य केलं.