माणूस घराबाहेर कोणीही असला, कितीही मोठा असला, तरी घरात बायकोशी भांडण झाल्यावर नवऱ्यालाच सॉरी म्हणावं लागतं, असा घरगुती किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. अभिनेता रितेश देशमुखनं लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात या दोघांनी अनेक गोष्टींवर अगदी दिलखुलासपणे भाष्य केलं.