वाशिम : सन १९०३ पासून पुढील अनेक वर्ष व-हाडवासीयांची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणा-या शकुंतला रेल्वेची सध्या मात्र पुरती दैना झाली आहे. या रेल्वेला ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. यवतमाळ ते मुर्तीजापूर या मार्गावर धावणारी शकुंतला रेल्वे आजही गोरगरिबांसाठी प्रवासाचे मुख्य साधन असून या रेल्वेचा आणि रेल्वेमार्गाचा विकास व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.