इन आँखों में बसी है एक दास्ताँ...

अपूर्वा नेमळेकरचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती प्रेमाची गोष्ट मालिकेत काम करताना दिसतेय.

अपूर्वा नेमळेकरने प्रेमाची गोष्ट मालिकेत साकारलेली सावनीची भूमिका निगेटिव्ह आहे. मात्र तरीदेखील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंत मिळतेय.

अपूर्वा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे आणि ती बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

अलिकडेच अपूर्वा नेमळेकरने इंस्टाग्रामवर फोटोशूट शेअर केले आहे. यात तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळतोय.

अपूर्वाने या फोटोशूटमध्ये पीच रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यात डोक्यावर ओढणी घेतली आहे. हातात रिंग, नाकात रिंकवाली नोज पिन, केसात झूमर माँग टिका घातला आहे.

या फोटोशूटमध्ये अपूर्वा खूपच सुंदर दिसते आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की,इन आँखों में बसी है एक दास्ताँ, इश्क़ की, इंतज़ार की, और बेपनाह वफ़ा की…

अपूर्वाच्या या फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. ते या फोटोववर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Click Here