वनिताला इंडस्ट्रीत येण्याआधी वाटायची भीती

एका मुलाखतीत वनिता खरातने तिच्या इंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल सांगितले होते.

वनिता खरात मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे. ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून घराघरात पोहचली.

एका मुलाखतीत वनिता खरातने तिच्या इंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल सांगितले होते.

वनिता म्हणाली, आयुष्यात संघर्ष हा करावा लागतोच. हा शो संपल्यानंतर पुढे काम शोधण्यासाठी संघर्ष करावा लागेल, पण तो आधीसारखा नसेल.

माझ्याकडे आधी वडापाव खायला सुद्धा पैसे नसायचे, आम्ही सर्वजण एकत्र पैसे करून वडापाव खायचो. या चंदेरी दुनियेत मी फीट होईल का? याची मला साशंकता होती, असे वनिता म्हणाली.

त्यावेळी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे खूप सुंदर आणि सौंदर्यवती अशी एक समज होती. त्यामध्ये मी फीट होईल का ? याबद्दल माझ्या मनात खूप शंका होती, असेही ती म्हणाली. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये आली आणि खूप काही बदलल्याचे वनिता खरात सांगते. इतर अभिनेत्री आणि मॉडेलप्रमाणेच सुंदर दिसू शकते हा आत्मविश्वास हास्यजत्रेने दिल्याचेही ती सांगते.

ती पुढे म्हणाली की, तू सगळ्या भूमिका साकारू शकतेस. जेव्हा तू साडी नेसतेस तेव्हा तू सगळ्यात सुंदर दिसतेस असा आत्मविश्वास मला सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांनी दिला. 

Click Here