तमीळ अभिनेत्री ज्योतिकाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले आहेत.
अभिनेत्री ज्योतिका अभिनयामुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीय.
ज्योतिकाने तीन महिन्यात ९ किलो वजन घटवून सर्वांना थक्क केलंंय. यासाठी तिला बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनकडून प्रेरणा मिळालीय.
ज्योतिकाने वजन घटवण्यासाठी तिच्या डाएटसोबत स्ट्रेंथ बेस्ड वर्कआउटही करते.
ज्योतिकाने सांगितले की, यापूर्वी तिने अशाप्रकारच्या डाएटिंग स्टाइलचे प्रयोग करून पाहिलेत. जसे की इंटरमिटेंट फास्टिंग आणि हाय इंटेंसिटी एक्सरसाइज रुटीन. मात्र तिला काहीच फरक जाणवला नाही.
ज्योतिका म्हणाली की, मला हेल्दी वेट मेंटेन ठेवण्यासाठी नेहमीच अडचणींचा सामना करावा लागत होता.
ती म्हणाली की, माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये माझे पोट, डाइजेशन, इंफ्लेमेटरी फूड्स आणि फूड बॅलेंसिंगबद्दल खूप काही शिकले.
एक्सपर्ट्सचं हेदेखील म्हणणं आहे की, गट हेल्थ आपल्या मेटाबॉलिज्मला बूस्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
फायबर रिच फूड्स, फर्मेंटेंड फूड्स आणि प्रोबायोटिक्स सारखे दही खाण्यामुळे पचन करण्यास मदत होते. भूख रेग्युलेट होते आणि ब्लोटिंग कमी होते. या सर्व गोष्टी लाँग टर्म फॅट लॉससाठी मदत करतात.
ज्योतिकाने स्ट्रेंथ ट्रेनिंगवरही लक्ष केंद्रित केलंय. स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआउटमुळे फक्त तिची बॉडी टोन झाली नाही तर तिला फंक्शनल स्ट्रेंथदेखील मिळाली.