आनंद द्विगुणित! लग्नाच्या वाढदिवशीच आई बनली खेळाडू

कधीकाळी भारताच्या माजी क्रिकेट कॅप्टनसोबत अफेअर सुरू असल्याची होती चर्चा

भारताची माजी बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा आई बनली आहे. तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. 

ज्वाला गुट्टाने २२ एप्रिल २०२१ रोजी तामिळ अभिनेता विष्णु विशालसोबत लग्न केले होते. आता २२ एप्रिललाच ती आई बनली आहे.

ज्वाला गुट्टा आई बनल्याची बातमी पती विष्णु विनोद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर दिली. मुलीच्या हाताचा फोटो त्यांनी शेअर केला.

लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी आम्हाला हे गिफ्ट मिळालं आहे असं सांगत विष्णु विशाल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

ज्वाला गुट्टा आणि विष्णु विशाल हे २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर २०२१ साली या दोघांनी लग्न केले.

ज्वाला गुट्टाचं खासगी आयुष्य कायम चर्चेत राहिले. मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासोबत तिचं नाव जोडले होते. बऱ्याचदा या दोघांनी त्यांचे खंडन केले.

विष्णु विशाल हा ज्वाला गुट्टाचा दुसरा पती आहे. बॅडमिंटन खेळाडू चेतन आनंदसोबत ज्वालाने २००५ साली पहिले लग्न केले, ते २०११ साली मोडले. 

Click Here