क्रेडिट कार्डचे व्याज हे खासगी सावकारकीच्या जाचासारखेच

बहुतांश लोक क्रेडिट कार्डवर नियमित खरेदी करताना दिसतात. 

क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यानंतर त्याचे बिल विहित बिलिंग सायकलमध्ये भरणे अनेकांना शक्य होत नाही. मग हे बिल थकून मोठा भुर्दंड खरेदीदारास बसतो. 

यावर उपाय आहे का? हो, हे बिल तुम्ही कर्जात रूपांतरित करून थकीत रकमेचे ईएमआय करून घेऊ शकता. मात्र, त्यावरही भरमसाट व्याज द्यावेच लागते.

बहुतांश लोक क्रेडिट कार्डवर खरेदी करतात. क्रेडिट कार्डची थकबाकी कर्जात रूपांतरित केल्यास बँका त्यावर २.५ ते ३.५ टक्के मासिक व्याज आकारतात. 

व्याजाचा हा दर वार्षिक ३० ते ४२ टक्के होतो. हा व्याज दर वैयक्तिक कर्जावरील व्याजाच्या तुलनेत तिपटीने जास्त आहे. 

याशिवाय बँका त्यावर प्रक्रिया शुल्क आणि जीएसटीसुद्धा लावतात. त्यामुळे हा व्याज दर मासिक ४ ते ५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. 

क्रेडिट कार्डवरील बिल कर्जात रूपांतरित केल्यास ग्राहकांना खासगी सावकारासारख्या जबर व्याजाचा भुर्दंड बसू शकतो.

त्यामुळे हे बिल नियमित बिलिंग सायकलमध्ये अदा करणेच योग्य आहे.

Click Here