पचन व्यवस्थित व्हावे यासाठी काही पेय पिणे फायद्याचे ठरेल. रोज कोणतेही एक पेय प्या.
रोज सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिणे ही फार चांगली सवय आहे. गरम पाण्यामध्ये लिंबू पिळा व ते पाणी प्या.
आपण चहामध्ये आलं टाकतो पण फक्त आल्याचा चहा पिणे जास्त फायद्याचे ठरते. ब्लोटींग होत नाही.
जेवणानंतर ताक पिणे फार उपयुक्त ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर ताक प्यायलाच हवे. पोटाला थंडावा मिळतो.
पोट साफ होत नसेल तर पाण्यामध्ये बडीशेप उकळवून ते पाणी पिणे फायद्याचे ठरते. बडीशेप पचनासाठी फार चांगली असते.
पचनासाठी पेपरमींट टी फार उपयुक्त आहे. आतड्यांना आराम मिळतो. पोट साफ होते.
आपण कोरफड केसांना लावतो मात्र कोरफडीचा रस प्यायल्याने पोट साफ होते. पोटातील जळजळ कमी होते.
वजन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर पितात. तसेच ते प्यायल्याने पोट साफ होते. जेवणाआधी प्यायचे.