गुंतवणूक करण्याच्या आधी आपला इमर्जन्सी फंड तयार करावा.
तरुणांनी गुंतवणूक करण्याच्या आधी आपला इमर्जन्सी फंड तयार करावा. लोक आपले सगळे मासिक उत्पन्न खर्च करून टाकतात.
अचानक उत्पन्न थांबले तर एक महिना कसाबसा पुढे ढकलण्याएवढी बचतही लोकांकडे नसते. अशा परिस्थितीत गुंतवणूक कशी करणार?
ऐनवेळी आजार वा इतर काही संकट उद्भवले तर निर्वाह कसा करणार?
म्हणून नियमित उत्पन्न अचानक थांबले, तरी किमान सहा महिने दैनंदिन खर्च भागविता येईल, एवढा आणीबाणी निधी तुमच्याकडे तयार असला पाहिजे.
मध्यमवर्गीयांनी कर्जाच्या मासिक हप्त्याच्या (ईएमआय) जाळ्यातून बाहेर पडायला हवे. शिक्षण घ्या, नोकरी करा, घर घ्या आणि हप्ते फेडा.
महिन्याचा खर्च १ टक्का कमी करा. आजारपण माणसाला पाच वर्षे मागे नेते. त्यामुळे वित्तीय सुरक्षेचा भाग म्हणून आरोग्य विमा खरेदी करा.
श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. श्रीमंत बनण्यासाठी पर्सनल फायनान्सच्या उत्तम सवयी आणि धैर्य हवे.