मुंबईकर असाल तर 'या' ठिकाणची पाणीपुरी खायलाच हवी...
सिंध पाणीपुरी, चेंबूर धारावीच्या माटुंगा लेबर कॅम्पमधील सिंध पाणीपुरी सेंटरची पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे. इथं बटर पाणीपुरी म्हणजे बटर वापरुन तयार केलेली पुरी खवय्यांची आवडती आहे.
वांद्रे पश्चिम, पाली रोडवरील 'पंजाब स्वीट हाऊस'ची पाणीपुरी देखील एकदा नक्की ट्राय करुन पाहा. इथल्या पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारी चिंचेची चटणी विशेष ओळखली जाते.
वांद्रे पश्चिम येथील हिल रोडवरील एल्को पाणीपुरी सेंटरवर नेहमी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. इथल्या पाणीपुरीत वापरण्यात येणारा सिक्रेट सॉस एक वेगळीच चव पाणीपुरीला देतो.
चर्चगेटच्या बी रोडवरील नटराज पाणीपुरी मुंबईतील पाणीपुरीचं एक जुनं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. याच परिसरात आधी नटराज नावाचं एक हॉटेल होतं ते आता बंद झालं.
कुलाब्यातील कैलाश पर्वत हॉटेल देखील चमचमीत पाणीपुरीसाठी ओळखलं जातं. इथल्या पाणीपुरीसाठी सिंधी पुऱ्या वापरल्या जातात. ज्या सर्व एकाच आकाराच्या, कुरकुरीत आणि तुपात बनवलेल्या असतात.