अभिनेत्री शूटिंगची जोरदार तयारी करत होती आणि अचानक...
'इश्कबाज'मध्ये अनिता ही व्यक्तिरेखा साकारून अभिनेत्री सूरभी चंदना खूप लोकप्रिय झाली.
सूरभीचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. ती जेव्हा या क्षेत्रात आली तेव्हा तिला टीकेचा सामना करावा लागला.
अभिनेत्रीची आई नेहमीच तिच्यासोबत ऑडिशनला जायची. करियरच्या सुरुवातीला तिला एक जाहिरात मिळाली होती.
सूरभी शूटिंगची जोरदार तयारी करत होती आणि फक्त १५ मिनिटं बाकी होती.
१५ मिनिटं असतानाच अभिनेत्रीला अचानक सेटच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. हे ऐकून तिला फारच वाईट वाटलं.
जर तुम्ही एखाद्याला बोलावत असाल आणि नंतर जायला सांगत असाल तर ते चुकीचं आहे असं सूरभीने म्हटलं आहे.