राजमा सॅलेड खा पोटभर, वजन कमी होईल सरसर

राजमा पौष्टिक असतो. त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात. राजम्याचे सॅलेड ही रेसिपी अगदी सोपी आणि आरोग्यदायी आहे. पाहा काय कराल.

आहारामध्ये सॅलेड तर असायलाच हवे. अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट असा हा पदार्थ रोज खाल्ला तरी हरकत नाही. अनेक प्रकारचे सॅलेड करता येतात.

सॅलेडसाठी काकडी, दही, टोमॅटो, शिजवलेला राजमा, मीठ, पुदिना, कोबी हे पदार्थ वापरा. सगळ्या भाज्या चिरुन दह्यामध्ये एकजीव करा. वरतून मीठ घाला. 

दही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खायला हवे. दह्यामुळे शरीराला गरजेचे पोषण मिळते.

काकडी शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. थंडावा मिळतो आणि इतरही सत्वे मिळतात. 

कोबी हा सॅलेड करताना वापरला जाणारा कॉमन पदार्थ आहे. पोटभरीचा होतो तसेच कच्चा कोबी जीवनसत्त्वांनी भरलेला असतो. 

पुदिना पचनासाठी फार चांगला असतो. तसेच चवीलाही छान लागतो.

हे सॅलेड पोटभरीचे तसेच प्रोटीनने भरलेले आहे. वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरेल.

Click Here