बॉलिवूड सेलेब्सच्या चांगल्या रिलेशनशीप्सचे आहे हे सीक्रेट

बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ एकमेकांसोबत राहणाऱ्या कपल्सने नातं टिकवण्यासाठी दिल्यात खास टिप्स

"लग्न करण्याआधी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो", असं रणवीर दीपिकाविषयी एका मुलाखतीत म्हणाला होता

"जर नात्यामध्ये वारंवार तणाव निर्माण होत असेल तर आधीच वेगळे व्हा", असं सोनम कपूर म्हणाली होती 

"आपल्या पार्टनरचा आदर करणे, ही रिलेशनशीपमधील सर्वात मोठी गोष्ट आहे", असं शाहरुख खान म्हणाला होता

"आपल्या पार्टनरकडून सन्मान मिळण्याची स्त्रीला अपेक्षा असते. त्यामुळे आपल्या पत्नीचा मान राखणं हाच माझ्यासाठी रोमान्स आहे", अशी महत्वाची गोष्ट शाहरुखने सांगितली

"तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. जर खूश राहण्यासाठी तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून असाल तर समोरच्या व्यक्तीला त्या नात्याचं ओझं वाटेल", असं कतरिना कैफ म्हणाली

"कामात कितीही व्यस्त असलो तरीही एकमेकांसाठी वेळ काढावा. इतर गोष्टींपेक्षा तुम्हाला तुमच्या नात्याला महत्व देता यायला हवं", असं प्रियंका चोप्राचं मत आहे

Click Here