भाताचे ७ प्रकार, झणझणीत फोडणीचा भात ते बिर्यानी!

भाताचे वेगवेगळे प्रकार आणि चव सगळ्यांचीच भन्नाट. तुम्हाला भात कसा आवडतो?

भाताचे अनेक प्रकार भारतात केले जातात. चवीला भाताचा हा प्रत्येक पदार्थ वेगळा असतो. उरलेला भात वापरा किंवा मग ताजा वापरा. फोडणीची सारी कमाल असते.

आपण तोंडलीची भाजी करुन खातो. पण कधी तोंडली भात खाल्ला आहे का? हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. करायला अगदीच सोपा आहे. चवही मस्त लागते.

तुम्ही कधी पुदिना भात खाल्ला आहे का? लसूण, कोथिंबीर व पुदिना घालून केलेला हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांसाठी अगदीच मस्त आहे.

लेमन राईस हा पदार्थ प्रामुख्याने दक्षिण भारतात केला जातो. अगदी साधा पदार्थ असून करायला मोजून १५ मिनिटे लागतात. अगदी चविष्ट लागतो. 

टोमॅटो राईस तर तुम्ही नक्कीच खाल्ला असेल. छान लाल-चुटूक दिसणारा हा भात मस्त झणझणीत लागतो. नाश्त्यासाठी हा पदार्थ नक्कीच करायला हवा.

दही भात हा पदार्थ लहानपणी भरपूर खाल्ला असेल. हे अगदी कम्फर्टींग फूड आहे. पोटाला थंडावा मिळतो तसेच फोडणी दिली की मस्त झणझणीतही लागतो. 

खास पाहुणे जेवायला घरी आले की आई मस्त मसाले भात करते. भाताच्या जोडीला कढी किंवा रायता असेल तर मग मज्जाच. 

नारळी भात हा पदार्थ अत्यंत चविष्ट लागतो. तसेच करायलाही सोपा आहे. सणासुदीला हा पदार्थ महाराष्ट्रात केला जातो.

Click Here